Join us

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 13:53 IST

Gold Rate Weekly Update : या आठवड्यात सोने आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली आहे.

Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरातील घसरण कायम आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी खरेदीची चांगली संधी निर्माण झाली आहे. जागतिक व्यापार तणावात आलेली थोडी शिथिलता आणि मौल्यवान धातूंची मागणी कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारापासून ते देशांतर्गत बाजारपेठांपर्यंत किमतींवर दबाव दिसून आला आहे. गेल्या आठवड्यात, सोन्याचा भाव केवळ चार दिवसांच्या व्यवहारात ६७७ रुपये प्रति १० ग्रॅमने खाली आला आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात तर बंपर घसरण दिसून आली आहे.

MCX आणि घरगुती बाजारात सोन्याची स्थितीसोने आपल्या उच्चांक पातळीवरून सध्या १.२० लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास व्यवहार करत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ५ डिसेंबरच्या एक्सपायरी असलेल्या सोन्याचा वायदा भाव ३१ ऑक्टोबर रोजी १,२१,२३२ रुपये होता, जो शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी १,२१,०३८ रुपयांवर बंद झाला. आठवडाभरात यात १९४ रुपयांची किरकोळ घट झाली. मात्र, उच्चांक पातळी १,३२,२९४ रुपयांच्या तुलनेत हे सोने आता ११,२५६ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त मिळत आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्सच्या वेबसाइटनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा बंद भाव १,२०,७७० रुपये होता, जो गेल्या शुक्रवारी १,२०,१०० रुपयांवर क्लोज झाला. म्हणजेच, आठवडाभरात घरगुती बाजारात सोन्याच्या किमतीत ६७० रुपये प्रति १० ग्रॅमची घसरण झाली आहे.

शुक्रवारचे सोन्याचे नवीनतम दर

सोन्याची गुणवत्ता नवीनतम दर (प्रति १० ग्रॅम) 
२४ कॅरेट गोल्ड १,२०,१०० रुपये 
२२ कॅरेट गोल्ड १,१७,२२० रुपये 
१८ कॅरेट गोल्ड ९७,२८० रुपये 

(टीप: या दरांमध्ये ज्वेलरी खरेदी करताना लागू होणारा ३% जीएसटी आणि मेकिंग चार्जेस समाविष्ट नाही.)

चांदी उच्चांकावरून कोसळलीघसरणीच्या बाबतीत चांदी सोन्यापेक्षा खूप पुढे आहे. चांदीचा भाव तिच्या उच्चांक पातळी १,७०,४१५ च्या तुलनेत आता २२,६२६ रुपयांनी स्वस्त होऊन १,४७,७८९ रुपये प्रति किलोग्रामवर मिळत आहे. घरगुती बाजारात चांदीचा भाव गेल्या १४ ऑक्टोबरच्या १,७८,१०० रुपयांच्या उच्चांकापासून तब्बल २९,८२५ रुपये प्रति किलोने स्वस्त झाला आहे. १ किलो चांदीचा नवीनतम दर सध्या १,४८,२७५ रुपये आहे, जो आठवडाभरात ८५० रुपयांनी कमी झाला आहे.

वाचा - सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

सध्या दर कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांनाही सोने-चांदी खरेदी करण्याची एक चांगली संधी मिळाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Big opportunity for investors: Gold and silver prices fall sharply!

Web Summary : Gold and silver prices have fallen, creating a buying opportunity for investors. Gold dropped ₹677 per 10 grams last week. Silver also saw a significant decline, making it cheaper by ₹22,626 per kg from its peak.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकशेअर बाजार